Mumbai, मार्च 22 -- KKR vs RCB IPL 2025 : आयपीएल २०२५ चा उत्सव आजपासून (२२ मार्च) सुरू होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा रंगणार आहे.

श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखाली केकेआरचा संघ गेल्या मोसमात चॅम्पियन बनला होता. मात्र, यावेळी संघाची कमान अजिंक्य रहाणे याच्या हाती असेल, तर दुसरीकडे बेंगळुरूचे कर्णधारपद रजत पाटीदार याच्या खांद्यावर आहे.

ईडन गार्डन्सची खेळपट्टी हाय स्कोअरिंग सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे सुरुवातीला फलंदाजी करणे सोपे आहे आणि फलंदाजी करणारा संघ डावाच्या सुरुवातीच्या षटकांमध्ये वर्चस्व गाजवू शकतो. पण जसजसा चेंडू जुना होतो तसतशी फिरकीपटूंना मदत मिळ...