Mumbai, फेब्रुवारी 1 -- Modi Government Budget 2025: भारत सरकारकडून किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात ही घोषणा केली. यापूर्वी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाख रुपये होती. यावेळी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढणार असल्याची बरीच चर्चा झाली होती.

सध्या ७.७ कोटी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे. शासनाच्या वतीने शेतकरी, मच्छीमार, दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना या क्रेडिट कार्डचा लाभ मिळतो. सरकारने आता त्याची मर्यादा वाढवून पाच लाख रुपये केली आहे. यापूर्वी ही मर्यादा तीन लाख रुपये होती. म्हणजेच आता शेतकऱ्यांना स्वस्त दरात अधिक कर्ज मिळू शकणार आहे.

शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी पुरेसे आणि वेळेवर कर्ज मिळावे, यासाठी किसान क्रेडिट कार्ड यो...