Pune, एप्रिल 23 -- Pune Accident News : पुणे सातारा महामार्गावर आज सकाळी पहाटे ४ च्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली आहे. एक भरधाव वेगतील दारूचा टँकर रस्त्यावर पलटी झाला असून या मुळे मोठ्या प्रमाणात अल्कोहोल रस्त्यावर सांडले. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेत ट्रक चालक हा जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे काही कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी क्रेनच्या साह्याने हा कंटेनर बाजूला घेण्याचे काम सुरू केले. हा कंटेनर बाजूला घेण्यात आला आहे.

पुण्यात आज सकाळी खेडशिवापुर येथे एक अपघात झाला. पहाटे ३.४४ च्या सुमारास खेड शिवापुर टोल नाक्याच्या पुढे तृप्ती हॉटेल समोर राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचा अल्कोहोल घेऊन जाणारा टँकर (MH ४८ BM ४१३२) हा सांगली वरून वसई विरारला जात अ...