Mumbai, जानेवारी 27 -- Mumbai KES College News: मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील केईएस कॉलेजला आज (२७ जानेवारी २०२५) बॉम्बने उडवून देणाऱ्या धमकीचा मेल आला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. केईएस कॉलेजच्या अधिकृत ईमेल आयडीवर धमकीचा ईमेल पाठवण्यात आला. यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील केईएस कॉलेजला त्यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर बॉम्बच्या धमकीचा ईमेल आल. याबाबत कॉलेज प्रशासनाने पोलिसांना माहिती देताच पोलीसांचे एक पथक ताबडतोब कॉलेजमध्ये दाखल झाले. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा प्रोटोकॉल जारी करण्यात आले. अधिकारी कॉलेज परिसरातील कसून तपासणी करत...