Mumbai, जानेवारी 28 -- Share Market : आठवड्याच्या पहिल्या दिवशी ढासळलेले सेन्सेक्स आणि निफ्टी आज सावरत असताना केनेस टेक्नॉलॉजीच्या शेअरमध्ये तब्बल १९ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ चे महसुली अंदाज घटवल्यानंं ही घसरण झाली आहे. कंपनीनं महसुली अंदाज ३,००० कोटी रुपयांवरून २,८०० कोटी रुपयांवर आणला आहे.

सीएनबीसी-टीव्ही १८ च्या वृत्तानुसार, कंपनीच्या व्यवस्थापनानं डिसेंबर तिमाहीत काही ऑर्डर्स पूर्ण करण्यास विलंब झाल्याची कबुली दिली. त्यामुळं औद्योगिक क्षेत्रातील १०० कोटी रुपयांच्या ऑर्डर्स अपूर्ण राहिल्या. यापैकी बहुतांश ऑर्डर चालू तिमाहीत पूर्ण होतील, असा अंदाज आहे. २०२६ या आर्थिक वर्षासाठी कंपनीनं ४,५०० कोटी रुपयांच्या महसुलाचा अंदाज व्यक्त केला असून, १५ टक्क्यांपेक्षा जास्त मार्जिन मिळण्याची अपेक्षा आहे.

आर्थिक वर्ष २०...