Mumbai, फेब्रुवारी 6 -- Karuna Munde on Family Court Verdict : करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नीचा दर्जा देतानाच त्यांना महिन्याला २ लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयानं आज दिले. मात्र, न्यायालयाच्या या आदेशाला करुणा मुंडे उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.

करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती. धनंजय मुंडे हे माझे पती असून त्यांनी मला पोटगी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली होती. न्यायालयानं ती मान्य केली व धनंजय मुंडे यांनी दरमहा २ लाखांची पोटगी द्यावी असे आदेश दिले.

कौटुंबिक न्यायालयाच्या निकालानंतर करुणा मुंडे अधिकच आक्रमक झाल्या आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी पोटगीची रक्कम १५ लाख मिळावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी उच्च न्यायालय...