Mumbai, फेब्रुवारी 9 -- Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज शुक्रवारी व्यातिपात योग आणि चतुष्पाद करण असा दुहेरी योगाचा प्रभाव राहणार आहे. कसा राहील कर्क, सिंह व कन्या राशीसाठी आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

आज ग्रहमान अनुकुल आहे. बुद्धीच्या जोरावर अनेक कामे मार्गी लागतील. अधिकाराच्या जागेवर असणाऱ्यांना मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. कामाच्या बाबतीत दुसऱ्यांना कामाला लावाल. मर्दानी खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक ठरेल. कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचार पूर्वक करा. ...