Mumbai, फेब्रुवारी 10 -- Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज शनिवारी चंद्र अहोरात्र शनिच्या राशीतुन आणि मंगळाच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. शनि-चंद्र विषयोग निर्माण होत असून, कसा राहील कर्क, सिंह व कन्या राशीसाठी आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

आज चंद्र सुखस्थानातून भ्रमण करतोय. तुमच्यात असलेली कला लोकांपर्यंत पोचावी याचा आटोकाट प्रयत्न कराल. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. आयत्या वेळच्या खर्चासाठी मात्र तरतूद करून ठेवावी लागेल. गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल. नोकरीत नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही. तुमच्या बुद्धी मत्तेवर वरिष्ठ खूष होतील. त्यामुळे काही गोष्टी आपसूकच तुमच्या हिताच्या झाल्यामुळे तब्येत खूष होऊन जाईल. रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आ...