भारत, जानेवारी 9 -- मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत व मालदीवमधील संबंधात कटुता आली आहे. मोईज्जू सरकारच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याने सोशल मिडियावर भारतीयांनी संताप व्यक्त केला. यानंतर बॉयकॉट मालदिव हा ट्रेंड देखील सुरू केला आहे. याचा गंभीर परिणाम मालदिवच्या पर्यटणावर होताना दिसत आहे. अनेक कलाकारांनी देखील नाराजी व्यक्त केली. यामध्ये कंगना रणौतचा देखील सहभाग आहे.

अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच चर्चेचा विषय ठरत असते. ती सामाजिक विषयांवर बिनधास्तपण वक्तव्य करताना दिसते. नुकताच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत वक्तव्य केले आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपमध्ये पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मालदीवमधील काही लोक यावर ज्यापद्धतीने व्यक्त होत आहेत, त...