Mumbai, फेब्रुवारी 26 -- प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील आठवी तिथी कालाष्टमी म्हणून ओळखली जाते. या दिवशी हिंदू भाविक भगवान भैरवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील करतात. वर्षभरात १२ कालाष्टमी असतात. भगवान शिवाचे रुद्र रुप कालभैरव देवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते.

Kalashtami 2024: नववर्षातील पहिली कालाष्टमी, या गोष्टी केल्यास शनि-राहूच्या त्रासातून मुक्ती मिळवाल

दर महिन्याला कालाष्टमी हा सण साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यात, हे व्रत रविवारी (३ मार्च) पाळले जाईल. जर तुम्हाला भैरव नाथांचा आशीर्वाद घ्यायचा असेल, तर तुम्हाला या दिवसाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत.

भाविक सकाळी उठून स्नान करतात. यानंतर व्रत संकल्प करा. मग आपले घर आणि देवघर स्वच्छ करा. भैरवनाथाची मूर्ती ...