Mumbai, फेब्रुवारी 13 -- Kabaddi News : स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत रायगडच्या मिडलाइन अ‍ॅकॅडमीनं बाजी मारली आहे. मिडलाईनच्या संघानं ठाणे महानगरपालिका संघाचं आव्हान ३२-२२ असं सहज परतावून लावत पहिल्यांदाच जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं.

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत जयश्री सावंत क्रीडानगरीत झालेला अंतिम सामना पाहाण्यासाठी हजारो कबड्डीप्रेमींनी गर्दी केली होती. मात्र, सामना अपेक्षेप्रमाणे रंगला नाही. मिडलाइन संघानं हा सामना जवळपास एकतर्फी जिंकला.

तत्पूर्वी, उपांत्य सामन्यात मिडलाइननं मुंबई पोस्टलविरुद्ध जोरदार खेळ दाखवत मध्यंतरालाच २१-१७ अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर पोस्टलच्या सौरभ कुलकर्णी आणि शुभम रहाटेनं वेगवान खेळाच्या जोरावर संघाला बरोबरीत आणलं होतं. मात्र मिडलाईननं शेवटच्या क्षणी ...