Bengaluru, एप्रिल 25 -- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे आज (शुक्रवार, २५ एप्रिल) सकाळी बंगळुरू येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत, अशी माहिती कौटुंबिक सूत्रांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून ते वयोमानाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव रामन रिसर्च इन्स्टिट्यूट /येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

आज सकाळी बंगळुरू येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव २७ एप्रिल रोजी रमण रिसर्च इन्स्टिट्यूट (आरआरआय) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. महत्त्वाकांक्षी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा (एनईपी) मसुदा तयार करणाऱ्या मसुदा सम...