Mumbai, मार्च 4 -- Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

बायको लाडात येऊन नवऱ्याला म्हणते,

अहो, ऐका ना!

नवरा - (वैतागून) काय?

बायको - मला केसं सरळ करायला पार्लरमध्ये जायचंय. पैसे द्या ना!

नवरा - पार्लर कशाला पाहिजे? घरीच कर ना!

बायको - घरी नाही सरळ होत

नवरा - आख्खं खानदान सरळ केलंस आणि केस सरळ होत न्हाय व्हय तुझे

.

वडील - काय रे बंड्या, तू पायाचे अंगठे धरून का उभा आहेस?

बंड्या - तुम्हीच म्हणाला होतात ना बाबा की शाळेत जे करशील ते अर्धा-एक तास घरी करत जा म्हणून.

बाबांवर मन:शांतीसाठी ध्यानधारणा करण्याची वेळ आलीय!

.

एक बेवडा गच्चीतून खाली पडला!

आवाज झालेला ऐकून आजूबाजूचे धावत आले.

त्यांनी विचारलं काय र...