Mumbai, मार्च 6 -- Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

बायको - अहो ऐकलंत का?

नवरा - (त्रासलेल्या स्वरात) काय? बोलं!

बायको - या महिन्यात मी तुमच्याशी कमी भांडणार

नवरा - अरे व्वा! कसं काय?

बायको - कारण हा महिना २८ दिवसांचा आहे.

.

नवरा-बायकोमध्ये भांडण सुरू असतं.

नवरा - तुझी आईच माझ्या मागे लागली होती, म्हणे माझ्या मुलीशी लग्न करा! लग्न करा!

बायको - हो, तुम्ही पण मला पसंत नव्हता. पण आई सारखी समजावून सांगायची.

अगं नवरा मूर्ख असला की संसार सुखाचा होतो!

बायको जोमात, नवरा कोमात

.

सासू - सूनबाई, असे हात मोकळे ठेवणं चांगलं नाही

सून - मी मोबाइल चार्जिंगला लावलाय सासूबाई

सासू - अगं भवाने, मी बांगड्यांबद्दल ...