Mumbai, फेब्रुवारी 11 -- Reliance Jio Prepaid Plans: पॉप्युलर ओटीटी सर्व्हिसेसचे सब्सक्रिप्शन मोफत हवे असेल तर वेगळे पैसे देण्याची गरज नाही. रिलायन्स जिओकडून असे अनेक प्लान ऑफर केले जात आहेत, ज्यातून रिचार्ज झाल्यास ओटीटी सेवांचे कॉम्प्लिमेंटरी सब्सक्रिप्शन दिले जात आहे. जिओच्या ८४ दिवसांच्या रिचार्जमध्ये सोनी लिव्ह आणि झी५ चे सब्सक्रिप्शन मोफत मिळत आहे.

रिलायन्स जिओच्या १ हजार ४९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना सोनीलिव्ह आणि झी५ कॉम्बो सब्सक्रिप्शन प्लान मिळतो. या प्लान मध्ये डेली डेटा बेनिफिटव्यतिरिक्त पात्र ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा दिला जातो. म्हणजेच जर तुमच्याकडे 5जी स्मार्टफोन असेल आणि जिओची 5G सेवा तुमच्या भागात उपलब्ध असेल तर तुमच्यासाठी डेली डेटा लिमिट लागू होणार नाही.

जिओ वापरकर्त्यांना या प्लानसह रिचार्ज केल्यास ८...