Mumbai, फेब्रुवारी 6 -- Jaya Ekadashi Shubhechha In Marathi : एका वर्षात २४ एकादशी व्रत पाळले जातात, जे सर्व भगवान विष्णूच्या उपासनेला समर्पित आहेत. असे मानले जाते की या तिथीला तिची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि धनाची देवी लक्ष्मीही प्रसन्न होते. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी साजरी केली जाते आणि यावर्षी ८ फेब्रुवारी २०२५ रोजी जया एकादशीचे व्रत केले जात आहे.

माघ शुक्लातील जया एकादशी ही सर्वात महत्त्वाची आहे. या दिवशी सृष्टीचे नियंता भगवान श्री हरी यांची आराधना करून व्रत पाळल्याने भक्ताला मोक्ष प्राप्त होतो, एवढेच नाही तर परमेश्वराच्या प्रभावाने भूत, नकारात्मक शक्ती आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते. या एकादशीच्या शुभ प्रसंगी तुम्ही पण तुमच्या प्रियजनांचा दिवस या शुभेच्छा संदेशांनी आणखी खास ...