भारत, फेब्रुवारी 1 -- Jaya Ekadashi 2025 date: हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या एका दशी तिथीला एकादशी व्रत केले जाते. भगवान विष्णूच्या उपासनेसाठी हा दिवस विशेष मानला जातो. जया एकादशीचे व्रत दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाते. दृक पंचांगानुसार जया एकादशीचे व्रत यावर्षी ०८ फेब्रुवारी रोजी केले जाईल. धार्मिक मान्यतेनुसार, जया एकादशीचे व्रत केल्याने जातकांना आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप आणि त्रासांपासून मुक्ती मिळते. असेही म्हटले जाते की, जया एकादशीव्रत केल्याने भगवान विष्णूच्या कृपेने मृत्यूनंतर भूत-पिशाच योनीत जावे लागत नाही. पितरांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्यफळ मिळते. चला जाणून घेऊ या, जया एकादशीची नेमकी तिथी, शुभ मुहूर्त आणि पारणा वेळ.

दृक पंचांगानुसार ...