Mumbai, फेब्रुवारी 4 -- Jaya Ekadashi Upay: हिंदू धर्मात एकादशी व्रताला खूप महत्त्व आहे. हा दिवस श्री हरी विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात आलेला आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या तिथीला जया एकादशी साजरी केली जाते. दृक पंचांगानुसार, जया एकादशी शनिवारी, ८ फेब्रुवारीला साजरी केली जात आहे. असे मानले जाते की, एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्यास मोक्ष प्राप्त होतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते. जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी काही विशेष उपायदेखील केले जातात. जाणून घेऊया जया एकादशीचे सोपे उपाय...

जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची योग्य विधीपूर्वक पूजा करावी. लक्ष्मी आणि नारायणासमोर तुपाचा दिवा लावावा. असे मानले...