Mumbai, मार्च 8 -- Jasprit Bumrah Fitness Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याला क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. दुखापतीमुळे बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळू शकला नाही, आता एक नवीन अपडेट समोर आले आहे, की तो आयपीएल २०२५ च्या पहिल्या दोन आठवड्यात एकही सामना खेळू शकणार नाही.

एका मीडिया रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराह एप्रिल महिन्यात मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षण शिबिरात सामील होऊ शकतो. तर आयपीएल २२ मार्चपासून सुरू होणार आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने म्हटले आहे की, "जसप्रीत बुमराहचे वैद्यकीय अहवाल चांगले आहेत. त्याने सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. परंतु आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याच्याकडून खेळण्याची फार कमी आशा आ...