Jammu kashmir, एप्रिल 20 -- Jammu and Kashmir landslides : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी सकाळी रामबन जिल्ह्यातील सेरी बागना परिसरात झालेल्या ढगफुटीत ३ जणांचा मृत्यू झाला. बचाव पथकाने जवळपास १०० जणांना वाचवले. ढगफुटी व अचानक आलेल्आ पुराने सरकारी शाळा, घरे व रस्ते वाहून गेले. डोंगरावरून वाहून आलेला दगड मातीचा ढिगारा गावांकडे आला आणि अनेक लोक आणि घरांना धडकला. यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये ३० घरं कोसळली. धरमकुंडला आलेल्या पुरात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण बेपत्ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे अनेक घरांची पडझड झाली. तर घर कोसळून दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला. पूर आणि दरड कोसळल्...