Mumbai, जानेवारी 26 -- Jalna News: जालन्यातील वाटुर फाटा येथे एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावातील व्यापाऱ्यासोबत पैशाच्या वादातून त्याने स्वत: पेटवून घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

प्रल्हाद भगस असे स्वत:ला पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हादने शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमरास जालन्यातील वाटुर फाटा येथे स्वत:ला पेटवून घेतले. यानंतर घटनास्थळी असलेल्या काही तरुणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. या तरुणांनी त्याला जखमी अवस्थेत प्रल्हादला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

जालन्यात...