Delhi, मे 14 -- jackie shroff In High Court : बॉलिवूडचा स्टार आणि ज्येष्ठ अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा 'भिडू' हा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. जॅकी श्रॉफ त्यांच्या बोलण्यात हा शब्द अनेकदा वापरतात. अनेक जण एकमेकांना संबोधतांना हा शब्द त्यांच्या बोलण्यात अनेक वेळा वापरत असतात. मात्र हा शब्द वापरण्यासंदर्भात जॅकी श्रॉफने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जॅकी श्रॉफने कोर्टात सादर केलेल्या याचिकेत त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव, फोटो त्याचा आवाज व त्यांचा प्रसिद्ध व आवडता शब्द 'भिडू' वापरू नये, अशी मागणी त्याने न्यायालयात केली आहे. त्याच्या वैयक्तिक व कॉपी राइट अधिकारांचे कोर्टाने रक्षण करावे अशी, मागणी देखील त्याने कोर्टात केली आहे.

जॅकी श्रॉफ याने दिल्ली हायकोर्टात सादर केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, आर्टिफिशियल इंट...