Mumbai, फेब्रुवारी 5 -- ITC Hotels : आयटीसी कंपनीतून नुकत्याच वेगळ्या झालेल्या आयटीसी हॉटेल्स कंपनीचा शेअर आज चर्चेच्या केंद्रस्थानी असेल. कारण आज, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी स्टॉक सेन्सेक्स आणि इतर BSE निर्देशांकांमधून बाहेर काढलेला असेल. मागील महिन्यात हा शेअर स्वतंत्रपणे सूचीबद्ध झाली होता.

हा शेअर पोर्टफोलिओ पुनर्संतुलनासाठी सेन्सेक्स आणि इतर निर्देशांकांमध्ये तात्पुरता समाविष्ट करण्यात आला होता. २९ जानेवारी रोजी भारतीय स्टॉक एक्स्चेंजवर तो सूचीबद्ध झाला होता. हा शेअर मंगळवार, ०४ फेब्रुवारी, दुपारी २ वाजेपर्यंत कट ऑफ वेळेपर्यंत लोअर सर्किटवर न आल्यानं ते BSE निर्देशांकातून काढून टाकले जातील.

मंगळवारी आयटीसी हॉटेल्सच्या शेअरची किंमत बीएसईवर ४.१६ टक्क्यांनी कमी होऊन प्रत्येकी १६४.६५ रुपयांवर बंद झाली. सेन्सेक्समधून वगळल्यामुळं इंडेक्स ट्र...