Shriharikota, फेब्रुवारी 15 -- ISRO INSAT 3DS Satellite: चंद्रयान ३, आदित्य एल १ या सारख्या मोठ्या मोहीमा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने राबवल्या आहेत. आत शनिवारी इस्रो आणखी एक इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. हवामानाची अचूक माहिती देता यावी या साठी तयार करण्यात आलेला अत्याधुनिक हवामान उपग्रह INSAT-3DS हा उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. शनिवारी (दि १७) फेब्रुवारीला संध्याकाळी ५.३० वाजता हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. जीएसएलव्ही एफ १४ या शक्तिशाली रॉकेटचा वापर या साठी केला जाणार आहे. इनसेंट-3 मालिकेतील उपग्रहांमध्ये सहा वेगवेगळ्या प्रकारचे जियोस्टेशनरी उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. यातील हा सहावा उपगर असून पुढील महिन्यात पुढील महिन्यात सातवा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

हवामानाचा अचूक अंदाज देता यावा या साठी इनसेंट-३...