Delhi, फेब्रुवारी 3 -- ISRO News : इस्रोच्या १०० व्या रॉकेट मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी प्रक्षेपित करणाऱ्या आलेल्या उपग्रहात रविवारी तांत्रिक बिघाड झाला आहे. भारताची नेव्हीगेशन यंत्रणा मजबूत करणारा २२५० किलो वजनाचा हा उपग्रह नेव्हिगेशन विथ इंडियन नक्षत्र अर्थात एनएव्हीआयसी मालिकेतील उपग्रहाचे थ्रस्टरने अचानक काम करणं बंद केलं आहे.

इस्रोच्या एनव्हीएस-०२ उपग्रहाचे बुधवारी प्रक्षेपण करण्यात आले होते. अंतराळात पाठवण्यात आलेल्या या उपग्रहाचे 'थ्रस्टर्स' काम करू न शकल्याने एनव्हीएस-०२ उपग्रह कक्षेत प्रस्थापित करण्याच्या इस्रोच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. इस्रोने रविवारी या घटनेची माहिती दिली आहे. एनव्हीएस-०२ या उपग्रहाला योग्य कक्षेत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न यानातील थ्रस्टर्सने योग्य पद्धतीने काम करत नसल्याने यशस्वी होऊ शक...