Delhi, एप्रिल 15 -- Israel-Iran War : इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले आहेत. मध्यपूर्व क्षेत्रात निर्माण झालेल्या या युद्धजन्य परिस्थितीवर भारताने चिंता व्यक्त केली आहे. भारताच्या चिंतेचे कारण म्हणजे या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षा तसेच भूराजकीय आणि आर्थिक हितसंबंध. युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताचे आर्थिक हितही धोक्यात आले आहे. या दोन्ही देशात सुमारे ३० हजार भारतीय राहतात. त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही सरकारची प्राथमिकता असून भारतीय दूतावास नागरिकांच्या संपर्कात असल्याचे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध झाल्यास त्याचा भारताच्या आर्थिक संबंधांवर परिणाम होऊ शकतो. भारताची इराणसोबतची वाढती आर्थिक भागीदारी, विशेषत: चाबहार बंदर विकासासारखे प्रकल्प रखडण्...