Israil, एप्रिल 14 -- Iran Israel War Update : इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायलने सीरियात इराणच्या दुतावसावर हल्ला केल्याचा बदला घेण्यासाठी काल रात्री इराणने इस्रायलवर (iran israel news) तब्बल २०० क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. मात्र, त्यातील बहुतांश क्षेपणास्त्र इस्रायलने हवेतच नष्ट केले असल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. हल्ल्यामुळे इस्रायल संरक्षण दलाच्या तळाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे इस्रायल गाझा युद्धानंतर आता इस्रायल इराण युद्ध पेटले आहे. या हल्ल्याला इस्रायल काय उत्तर देणार आता हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

आयडीएफच्या म्हणण्यानुसार, इराणची क्षेपणास्त्रे इस्त्रायली हवाई क्षेत्रात पोहोचण्यापूर्वीच एरो एअर डिफेन्स सिस्टमने नष्ट केली. इस्रायलच्या दक्षिण भागात असलेल्या तळाचे क्षेपणास्त्र आणि ...