Mumbai, फेब्रुवारी 10 -- IPO News : आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अजाक्स इंजिनीअरिंगचा आयपीओ आजपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. जाणून घेऊया या आयपीओबद्दल सविस्तर.

अजाक्स इंजिनीअरिंग कंपनीचा आयपीओ १२६९.३५ कोटींचा आहे. ऑफर फॉर सेल अंतर्गत कंपनी आयपीओच्या माध्यमातून २.०२ कोटी शेअर्स जारी करणार आहे. हा मेनबोर्ड आयपीओ आहे. आयपीओ आजपासून १२ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. आयपीओ शेअरवाटप १३ फेब्रुवारीला होणार आहे.

आयपीओची किंमत ५९९ ते ६२९ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. कंपनीनं एकूण २३ शेअर्सचा एक लॉट बनवला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना किमान १४,४६७ रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना प्रति शेअर ५९ रुपयांची सूट दिली आहे. अजाक्स इंजिनीअरिंगची लिस्टिंग ब...