Mumbai, जानेवारी 13 -- Share Market News : नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात अनेक नव्या कंपन्या शेअर बाजारात लिस्ट होत आहेत. इंडोबेल इन्सुलेशन या छोट्या कंपनीनं आज शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली आहे. आयपीओमध्ये ४६ रुपये किंमत असलेला कंपनीचा शेअर ९० टक्क्यांच्या वाढीसह ८७.४० रुपयांवर लिस्ट झाला.

जवळपास दुप्पट नफा दिसताच आयपीओ गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. त्याचा थेट परिणाम इंडोबेल इन्सुलेशनच्या शेअर्सच्या किंमतीवर झाला. हे शेअर्स जबरदस्त लिस्टिंगनंतर घसरले. कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून ८३.०३ रुपयांवर आला.

इंडोबेल इन्सुलेशन ही कंपनी मे १९७२ मध्ये सुरू झाली होती. ही कंपनी इन्सुलेशन उत्पादनांची निर्मिती करते. कंपनीची उत्पादनं निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक अनुप्रयोगांमध्ये वापरली जातात. इंडोबेल इंडियाचे प्रवर्तक विजय बर्मन, म...