Mumbai, जानेवारी 14 -- Share Market News : अव्हॅक्स अपॅरल्स अँड ज्वेलर्स या एसएमई आयपीओनं शेअर बाजारात धडाकेबाज एन्ट्री केली आहे. जोरदार लिस्टिंगनंतरही भाव वधारल्यानं कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागलं आहे. त्यामुळं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले असून मकर संक्रांतीचा दिवस गोड झाला आहे.

बीएसई एसएमईवर अव्हॅक्स अपॅरल्स अँड ज्वेलर्स आयपीओची लिस्टिंग ९० टक्के प्रीमियमसह झाली. हा शेअर १३३ रुपयांच्या पातळीवर खुला झाला. तर ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटनंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत १३९.६५ रुपयांवर पोहोचली आहे.

अव्हॅक्स अपॅरल्स अँड ज्वेलर्सचा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ७ जानेवारी रोजी खुला झाला. तो ९ जानेवारीपर्यंत खुला होता. कंपनीनं आयपीओसाठी प्रति शेअर ७० रुपये दर निश्चित केला होता. आयपीओचा एक लॉट २००० शेअर्सचा होता. त्यामुळ...