Mumbai, मार्च 29 -- CSK vs RCB Highlights : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी (२८ मार्च) चेन्नई सुपर किंग्जचा ५० धावांनी पराभव केला. चेपॉकमध्ये होणाऱ्या प्रत्येक सामन्यात संपूर्ण स्टेडियम पिवळ्या रंगात रंगलेले दिसते. 'सीएसके, सीएसके'च्या घोषणांनी स्टेडियम दुमदुमले असते, मात्र शुक्रवारी या मैदानातील चित्र काहीसे वेगळेच होते.

एमएस धोनीसमोर चेन्नईच्या स्टेडियममध्ये 'आरसीबी, आरसीबी'चे नारे लागताना सर्वांनी पाहिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

१९७ धावांचा पाठलाग करताना चेन्नईने अतिशय संथ सुरुवात केली. कर्णधार ऋतुराज गायकवाडसह त्यांचे आघाडीचे फलंदाजही लवकर बाद झाले. अशा परिस्थितीत आरसीबी विजयाकडे वाटचाल करत असताना चेपॉकवर सीएसकेचे चाहते निराश झाले.

मात्र तेथे उपस्थित असलेल्या विराटच्या चाहत्यांनी 'आरसीबी ...