Mumbai, मार्च 21 -- RCB vs KKR Match Ticket Online : आयपीएल २०२५ चा मोसम शनिवारी (२२ मार्च) सुरू होत आहे. या मोसमातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर उभय संघांमधील हा सामना होणार आहे.

या सामन्यासाठीची तिकिट बुकींग सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, BookMyShow नुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.

या हंगामातील पहिल्या सामन्याच्या तिकिटांची किंमत ९०० रुपयांपासून १५ हजार रुपयांपर्यंत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामन्याच्या तिकिटांना मोठी मागणी होती. त्यामुळे या सामन्याची तिकिटे संपायला जास्त वेळ लागला नाही.

पण तुम्हाला या सामन्याचे तिकीट हवे असेल तर?...