Mumbai, एप्रिल 1 -- IPL Points Table : आयपीेएल २०२५ मध्ये सोमवारी (३१ मार्च) मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ८ विकेट्सने पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिमयवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघ ११६ धावांत गारद झाला.

मुंबईचा गोलंदाज अश्विनी कुमार याने आपला आयपीएल पदार्पण सामना खेळताना ४ विकेट घेतल्या, त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने १३व्या षटकात विजयाची नोंद केली. सलामीवीर रायन रिकेल्टनने नाबाद ६२ धावा केल्या.

मुंबई इंडियन्सने हा सामना ८ गडी राखून जिंकला. या मोठ्या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या नेट रनरेटमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्स संघाने मोठी झेप घेतली आहे. तर पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्स शेवटच्या स्थानावर घसरला आहे.

आयपीए...