भारत, मार्च 29 -- IPL Points Table Update : आयपीएल २०२५ चा आठवा सामना (२९ मार्च) चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉकवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा ५० धावांनी पराभव केला.

विशेष म्हणजे, आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या या पराभवानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. वास्तविक, या पराभवानंतर ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सलग दुसरा विजय मिळाला. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २ सामन्यांत ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. यानंतर ऋषभ पंत याच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स दुसऱ्या स्थानावर आ...