New delhi, एप्रिल 18 -- आयपीएल २०२५ मध्ये खराब फॉर्मशी झगडत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या संघाने मुंबई इंडियन्सचा माजी फलंदाज डेवाल्ड ब्रेविसला मोसमाच्या मध्यावर आपल्या संघात स्थान दिले आहे. ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीनंतर संघाला मधल्या फळीतील स्फोटक फलंदाजाची उणीव भासत होती. ब्रेव्हिसच्या आगमनानंतर सीएसकेला मधल्या फळीत वेगवान धावा करण्यास सक्षम असा फलंदाज मिळणार आहे. चेन्नईने या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला २.२ कोटी रुपयांना संघात समाविष्ट केले आहे.

आयपीएल २०२५ चा हंगाम आतापर्यंत ५ वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जसाठी निराशाजनक ठरला आहे. संघाने खेळलेल्या ७ पैकी ५ सामने गमावले आहेत आणि त्यांना फक्त २ सामने जिंकता आले आहेत. या खराब कामगिरीमुळे हा संघ आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत सर्वात खालच्या दह...