Mumbai, एप्रिल 14 -- Ruturaj Gaikwad Replacement : चेन्नई सुपर किंग्जने ऋतुराज गायकवाड याच्या जागी आयुष म्हात्रे याचा संघात समावेश केला आहे. कोपराच्या फ्रॅक्चरमुळे कर्णधार गायकवाड संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे, त्यानंतर आता एमएस धोनी संघाचे नेतृत्व करत आहे. सीएसके ज्या खेळाडूंचा विचार करत होते त्यामध्ये पृथ्वी शॉचाही समावेश होता.

काही दिवसांपूर्वी संघाने काही तरुण खेळाडूंच्या चाचण्या घेतल्या, त्यानंतर संघाने मुंबईचा तरुण सलामीवीर फलंदाज म्हात्रे याला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.

पाच वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी हा निर्णय घेतला. तो (आयुष म्हात्रे) अद्याप संघाशी संबंधित नाही, पण तो येत्या काही दिवसांत सीएसके संघात सामील होऊ शकतो. फ्रँचायझीने त्याला ताबडतोब सामील होण्यास सांगितले आहे. आयपीएल लिलावात म्हा...