MUMBAI, मार्च 12 -- आयपीएलचा १८वा सीझन सुरू होण्यास आता फारसा वेळ उरलेला नाही. हा हंगाम २२ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र त्याआधी मुंबई इंडियन्ससह अनेक संघांसाठी बॅड न्यूज समोर आल्या आहेत.

वास्तविक, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सीझनच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडू शकतो. बुमराहसोबतच अनेक मोठ्या नावांचा या यादीत समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार मिचेल मार्श आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्सचा भाग आहे. पण आयपीएल २०२५ हंगामाच्या सुरुवातीला मिचेल मार्श दिसणार नाही. यापूर्वी, मिचेल मार्श आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचा भाग नव्हता.

त्याचवेळी, आता तो लखनौ सुपर जायंट्सकडून सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाही. मात्र, मिचेल मार्श मैदानात कधी परततो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान...