Mumbai, एप्रिल 2 -- IPL Points Table : आयपीएल २०२४ चा १३ वा सामना मंगळवारी (१ एप्रिल) पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने लखनौचा ८ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऋषभ पंत याच्या नेतृत्वाखालील लखनौ संघाने १७१ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात पंजाबने १६.२ षटकांत २ फलंदाजांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले आणि ८ गडी राखून मोठा विजय नोंदवला.

पंजाबकडून सलामीवीर प्रभसिमरन सिंग याने ३४ चेंडूत ६९ धावा फटकावल्या. त्याला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. या सामन्यानंतर पॉइंट टेबलमध्ये काय बदल झाले आणि आता ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप कोणाकडे आहे ते जाणून घेऊया.

पंजाब किंग्जने हा सामना जिंकून गुणतालिकेत पाचव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर मजल मा...