Mumbai, फेब्रुवारी 11 -- Share Market News : भारतीय शेअर बाजारात सातत्यानं घसरण सुरू असून आठवड्याचा पहिला दिवसही त्यास काल अपवाद नव्हता. निफ्टी १७८ अंकांनी घसरून २३,३८१ वर, बीएसई सेन्सेक्स ५४८ अंकांनी वधारून ७७,३११ वर, तर बँक निफ्टी निर्देशांक १७७ अंकांनी घसरून ४९,९८१ वर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉल कॅप सेगमेंटमधील घसरण चिंता वाढवणारी ठरली. या पार्श्वभूमीवर आज इंट्राडे खरेदीसाठी तज्ञांनी काही स्वस्त शेअर्स सुचवले आहेत.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक संशोधन विश्लेषक नागराज शेट्टी म्हणाले, 'निफ्टी ५० निर्देशांकाचा मूळ कल नकारात्मक आहे. २३,४०० अंकांच्या महत्त्वपूर्ण आधाराच्या खाली गेल्यानंतर अल्पावधीत बाजार २३,२०० किंवा त्यापेक्षा कमी होईल, अशी अपेक्षा केली जाऊ शकते. आज निफ्टीला तात्काळ प्रतिकार २३,५०० च्या पातळीवर ठेवण्यात आला आहे. ...