Mumbai, जानेवारी 28 -- Infosys News : देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक क्रिस गोपालकृष्णन, माजी IISc संचालक बलराम आणि इतर १६ जणांच्या विरुद्ध SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं उद्योगजगतात उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

७१ व्या शहर दिवाणी व सत्र न्यायालयाच्या (सीसीएच) निर्देशानुसार सदाशिव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आदिवासी बोवी समाजाचे दुर्गाप्पा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) मधील सेंटर फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजीमध्ये फॅकल्टी सदस्य होते.

२०१४ मध्ये आपल्याला हनी ट्रॅपच्या खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं आणि नंतर सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्याला जातीवाचक शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचा आरोपही त्य...