New delhi, फेब्रुवारी 1 -- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये पुढील आर्थिक वर्षासाठी रेल्वेसाठी २.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेनबाबत असे अपडेट दिले, ज्यामुळे लाखो प्रवाशांना आनंद होईल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अर्थसंकल्पात २०० वंदे भारत गाड्या बनवण्याच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले आहे.

पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून १७,५०० जनरल कोच, २०० वंदे भारत आणि १०० अमृत भारत गाड्या बनविण्यासारख्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी दिली. २०२५-२६ चा केंद्रीय अर...