भारत, जानेवारी 24 -- डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून इमिग्रेशन नियमांमध्ये मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर अमेरिकेतील इमिग्रेशन अधिकारी अलर्ट मोडवर गेले असून याचा पहिला फटका अमेरिकास्थित स्थलांतरित भारतीय समुदायाला बसला आहे. अमेरिकेत एच 1-बी सारख्या तात्पुरत्या व्हिसावर काम करत असलेले अनेक भारतीय राहत आहेत. नव्या इमिग्रेशन नियमांमधील यात संभाव्य बदल कोणते होणार याबाबत येथे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प यांनी सध्या नुसती घोषणा केली आहे. परंतु नेमके बदल काय केले जाणार याविषयी अनिश्चितता आहे. ट्रम्प हे इमिग्रेशन धोरणे कठोरपणे राबविण्याबाबत ओळखले जातात. त्यामुळे या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

'मिर्ची 9' या माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेत काम करत असलेल्या आपल्या मुलाला भेटायला...