New York, फेब्रुवारी 4 -- Indian Immigrants News in Marathi : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्तासूत्रे पुन्हा हातात घेतल्यानंतर 'अमेरिका फर्स्ट' धोरणाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. व्यावसायिक स्तरावर टॅरिफची अंमलबजावणी केल्यानंतर आता ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरितांकडं मोर्चा वळवला आहे. भारतालाही याचा फटका बसला आहे. अमेरिकी लष्कराचे सी-१७ विमान बेकायदा भारतीय स्थलांतरितांना घेऊन रवाना झालं आहे.

रॉयटर्सने एका अमेरिकी अधिकाऱ्याच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, विमानात २०५ भारतीय स्थलांतरित आहेत. ट्रम्प प्रशासनानं १८ हजार भारतीयांना बेकायदेशीर स्थलांतरित म्हणून घोषित केलं आहे. त्यातील पहिल्या २०५ जणांना भारतात पाठवल्याचं समजतं.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. हा एक व...