नई दिल्ली, मे 5 -- भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठे पाऊल उचलत अनेक राज्यांना मॉक ड्रिल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशात म्हटले आहे की, नागरी संरक्षण सुरळीत पणे सुनिश्चित करण्यासाठी राज्ये ७ मे रोजी मॉक ड्रिल करतील. केंद्र सरकारने जारी केलेल्या या आदेशाची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना आणि केव्हाही युद्धासारखे वातावरण असताना हा आदेश जारी करण्यात आला आहे.

यापूर्वी १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये दोन आघाड्यांवर युद्ध झाले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना पाठविलेल्या निर्देशात पुढील प्रकारचे मॉक ड्रिल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत:

१. हवाई हल्ल्याचा इशारा देणारे...