भारत, फेब्रुवारी 15 -- Lok Sabha Election 2024 : जसे-जसे लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीतून एक-एक पक्ष बाहेर पडत आहेत. केजरीवाल व ममता बॅनर्जी यांच्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले की, त्यांचा पक्ष स्वबळावर लोकसभा निवडणूक लढणार आहे.

पत्रकारांनी जागावाटपाबाबत प्रश्न विचारल्यानंतर ज्येष्ठ नेते अब्दुल्ला यांनी म्हटले की, जागा वाटपाबाबत मी एक गोष्ट स्पष्ट करतो की, नॅशनल कॉन्फ्रन्स स्वबळावर निवडणूक लढणार आहे. यावर कोणताही संभ्रम नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकाचवेळी होण्याची चिन्हे आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नीतीश कुमार यांनी एनडीएत प्रवेश केल्यापासून इंडिया आघाडीच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. जेडीयूनंतर आरएलडी पक्षही आघा...