Kolkata, जानेवारी 29 -- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या नव्या पुस्तकात काँग्रेसवर जोरदार टीका केली असून, केंद्रात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. काँग्रेसच्या चुकांमुळे विरोधी इंडिया आघाडीला निवडणुकीत यश मिळाले नाही आणि भाजपला बहुमताशिवाय पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळाली, असा दावाही ममतांनी केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तीन नव्या पुस्तकांचे प्रकाशन कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात करण्यात आले. यातील एका पुस्तकाचे नाव आहे 'बांगलार निर्बचों ओ आमरा' ('Banglar Nirbachon o Amra'). यामध्ये त्यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालावर आपले मत मांडले आहे.

भारतीय जनता पक्षाविरोधात एक मजबूत विरोधी आघाडी तयार करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला, ज्...