Pune, मे 24 -- Indapur Tehsildar Attack News: पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. इंदापूर शहरातील संविधान चौकात अज्ञातांनी श्रीकांत पाटील यांची गाडी फोडली. तसेच त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

तहसीलदार यांची गाडी इंदापूर शहरातील संविधान चौकात आली असता अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रॉडने हल्ला केला. सोबतच हल्लेखोरांनी मिरचीची पूड देखील आणली होती. या हल्ल्यात शासकीय गाडीची नुकसान झाल असून सुदैवाने तहशीलदार यातून बचावले आहेत. या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून परिसरात नाकेबंदी करण्यात आली.या...