भारत, ऑक्टोबर 6 -- टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेला २-१ ने पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आता याच संघाविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. त्यामुळे शिखर धवनकडे वनजे संघाचे नेतृत्व सोपण्यात आले आहे. धवनच्या नेतृत्वाखाली या वनडे मालिकेत अनेक युवा खेळाडू आपली प्रतिभा दाखवताना दिसणार आहेत. मात्र, पहिल्या वनडेसाठी ११ खेळाडूंची निवड करण्यासाठी धवनला खूप मेहनत करावी लागणार आहे.

टीम इंडियाचे टॉप ३ निश्चित

आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचे टॉप ३ निश्चित मानले जात आहेत. शिखर धवनसोबत शुभमन गिल डावाची सुरुवात करेल. गिलने अलीकडेच ओपनर म्हणून टीम इंडियासाठी वनडे फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. गिल पुन्हा एकदा दमदार ...