Pakistan, फेब्रुवारी 25 -- भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना आहे आणि पाकिस्तानची माध्यमे स्वत:चा अपमान करणार नाहीत, असे होऊ शकत नाहीत. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या हायव्होल्टेज लीग सामन्यात रविवारी भारताने पाकिस्तानला धूळ चारली. भारताने हा सामना तर जिंकलाच, पण विराट कोहलीच्या धडाकेबाज शतकामुळे पाकिस्तानच्या आशा पुन्हा एकदा मातीत मिसळल्या. आता पाकिस्तानी संघाचे चाहते आणि पाक मीडिया हा पराभव पचवू शकत नाही. दरम्यान, पाकिस्तानातील एका युट्यूब चॅनेलचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारताच्या विजयाबद्दल विचित्र गोष्टी सांगितल्या जात आहेत, ज्यावर तुम्ही हसू रोखू शकणार नाही.

या पाकिस्तानी टीव्ही डिबेटमध्ये एका पॅनेलिस्टने दावा केला आहे की, भारताने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर काळी जादू करण्यासाठी २२ पंडित पाठवले होते, ज्यामुळे पा...