भारत, नोव्हेंबर 29 -- christchurch weather forecast india vs new zealand 3rd odi: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी (३० नोव्हेंबर) होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ७ वाजता क्राइस्टचर्चमध्ये सुरू होईल. पहिला सामना जिंकून न्यूझीलंडचा संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला.

आता तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यावर पावसाचे सावट आहे. हा तिसरा सामनाही पावसामुळे वाहून गेला, तर त्याचा फायदा न्यूझीलंडला होईल. ते मालिका १-० ने जिंकतील. जर हा सामना झाला तर टीम इंडिया तो जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.

बुधवारी क्राइस्टचर्चमधील हवामानाचा अंदाज

AccuWeather नुसार, क्राइस्टचर्चमध्ये बुधवारी पावसाची ७६ टक्के शक्यता आहे. हा अंदाज खरा ठरला तर सामना होण्याच...